'मन की बात'मधील एक सामान्य 'मानकरी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात एका सर्वसामान्य व्यक्तीचं नाव घेऊन गौरव केला. स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख करत हे अभियान अधिक सक्षम सुरु ठेवण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

Updated: Dec 28, 2015, 04:45 PM IST
'मन की बात'मधील एक सामान्य 'मानकरी' title=

इंदूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात एका सर्वसामान्य व्यक्तीचं नाव घेऊन गौरव केला. स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख करत हे अभियान अधिक सक्षम सुरु ठेवण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

मन की बातमध्ये मध्य प्रदेशातील सिहोर तालुक्यातील भोजपूर गावात वास्तव्यास असलेल्या एका 65 वर्षीय दिलीप सिंह मालवीय या एका सामान्य कारागिराचे पंतप्रधानांनी आभार मानलेत आणि त्याचं कारणही तसंच आहे.

दिलीप सिंह मालवीय यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केलाय. गावातील कोणीही त्यांना बांधकामासाठी लागणारं सामान दिलं तर ते त्यांना पैसे न घेता शौचालय बांधून देतात. या पद्धतीनं आज पर्यंत त्यांनी 100 पेक्षा जास्त शौचालय बांधून दिलेत.

आपल्या या कामातून ते मानवतेचं कल्याण करत असून आपल्याला त्यांच्या सारख्या लोकांचा अभिमान असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.