वाघांच्या पिंजऱ्यात ‘त्याची’ उडी, वाघ गेले पळून

ऐकून आश्चर्य होते ना? पण हे खरं आहे. अशीच काहीशी घटना घडली मध्यप्रदेशमध्ये... एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने वाघांच्या पिंजऱ्यात उडी घेतली आणि दोन वाघ घाबरून पळून गेले. एका इंग्रजी दैनिकाने हे वृत्त दिले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 26, 2014, 06:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ग्वाल्हेर
ऐकून आश्चर्य होते ना? पण हे खरं आहे. अशीच काहीशी घटना घडली मध्यप्रदेशमध्ये... एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने वाघांच्या पिंजऱ्यात उडी घेतली आणि दोन वाघ घाबरून पळून गेले. एका इंग्रजी दैनिकाने हे वृत्त दिले आहे.
ग्वाल्हेरच्या गांधी प्राणीसंग्रहालयात सोमवारी संध्याकाळी पाच वाजता एका व्यक्तीने पांढऱ्या वाघांच्या पिंजऱ्यात उडी घेतली. त्याने नाव यशोनंदन कौशिक आहे. तो ग्वाल्हेरच्या आनंद नगर भागात राहतो. त्याने वाघांच्या पिंजऱ्यात उडी घेतली आणि वाघांना आव्हान दिले. तो एक तास या वाघांच्या पिंजऱ्यात होता. पण ते वाघ त्याच्या आसपास आले नाही.
या ठिकाणी जमलेले लोक हे दृश्य पाहून हैराण झाले. प्रथम तो एका भिंतीवर चढला नंतर त्याने काली उडी मारली. वाटत होते की दोन्ही वाघ त्याच्यावर हल्ला करतील, पण ते वाघ पळून गेले. त्यानंतर त्याने त्या वाघांना चिडविण्याचा प्रयत्न केला. तो त्या ठिकाणी नाचू लागला, त्यांना इशारे करून चिडवू लागला पण वाघांनी त्याच्याकडे लक्ष्य दिले नाही.

हे सगळे घडत असताना प्राणीसंग्रहालयाचा एक कर्मचारी पिंजऱ्यात गेला. त्याने वाघांना गुफेत बंद केले. नंतर या ठिकाणी पोलिस आले आणि त्याला अटक केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.