ममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ

पश्चिम बंगालमध्ये २७ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर २९ मे रोजी विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे. 

Updated: May 19, 2016, 06:02 PM IST
ममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ title=

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये २७ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर २९ मे रोजी विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे. 

ममतांची सर्वाधिक मतांकडे वाटचाल - (आघाडीवर) 

पश्चिम बंगाल (२९४/२९४) :  टीएमसी  १९४, सीपीएम ३१, काँग्रेस ४०, भाजप ४, इतर ३

दीदींची प्रतिक्रिया... 

भ्रष्टाचारमुक्त राजवटीला नागरिकांनी पसंती दिलीय, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दिलीय.

काय आहे निकाल... 

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनं पुन्हा मुसंडी मारत 

दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यश मिळवलंय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा करीश्मा पुन्हा दिसून आला. मोठं यश मिळताच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय.