नितीश कुमार मुख्यमंत्री होताच, बोट कापले

Updated: Nov 24, 2015, 07:25 PM IST
नितीश कुमार मुख्यमंत्री होताच, बोट कापले  title=

पटना : निवडणूक जिंकल्यानंतर अनेक नेत्यांचे समर्थक नाचतात, गातात, हाण्यामारा करतात अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील.

परंतु नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होताच. अनिल शर्मा या त्यांच्या समर्थकाने चक्क आपल्या हाताचे बोट कापले.

अनिल शर्मा उर्फ अली बाबा राहणारा जहानाबाद हा नितीश कुमार यांचा खूप मोठा समर्थक आहे. त्याने नितीश कुमार मुख्यमंत्री होताच आपल्या हाताचे बोट कापले आहे.

२० नोव्हेंबरला नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळा सपल्या नंतर शुक्रवारी अनिलने आपल्या हाताचे बोट कापून गावातील मंदिरामध्ये देवाच्या चरणी चढवल्यानंतर गंगेच्या पात्रात सोडले.

 त्याने या आधी ही २००५ आणि २०१० मध्येही आपल्या हाताची दोन बोटे कापली आहे. अनिल शर्माला या विषयी विचारले असता त्यांने सांगितले कि प्रत्येकाचे आपल्या आपल्या नेत्यांबदल प्रेम व्यक्त करण्याचे वेगवेगळे  मार्ग असतात.

मी माझे बोट कापतो. जर नितीश कुमारजी मुख्यमंत्री झाले नसते, तर मी आत्महत्या ही केली असती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.