एका तरुणाने केली तीन कुत्र्यांची हत्या

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क मेट्रो स्थानकाबाहेरील आवारात एका व्यक्तीने तीन भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याची ही घटना आहे.

Updated: Mar 21, 2016, 12:39 PM IST
एका तरुणाने केली तीन कुत्र्यांची हत्या  title=

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क मेट्रो स्थानकाबाहेरील आवारात एका व्यक्तीने तीन भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याची ही घटना आहे. सीसीटीव्हीत कैद झाल्याने हा प्रकार लोकांसमोर आला आहे.

ग्रीन पार्क स्थानकाबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कुत्र्यांचे तीन मृतदेह पोलिसांना आढळले. यात एका कुत्र्याच्या पिल्लाचाही समावेश होता. याप्रकरणी सीसीटीव्ही फूटेज तपासले असता हा प्रकार समोर आला. या फुटेजमध्ये एक तरुण या तीन कुत्र्यांवर हल्ला करत असल्याचे दिसतेय. 

याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या व्यक्तीचा पोलीस शोध घेतायत. स्थानिकांच्या मते या परिसरात याआधीही अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.