अरे देवा, अखेर भारतात इबोलाची एंट्री!

भारतात इबोलाचा पहिला पेशंट आढळलाय, लायबेरियाहून १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत परतला होता, सध्या या पेशंटला वेगळं ठेवण्यात आल्याची माहिती.

PTI | Updated: Nov 19, 2014, 08:02 AM IST
अरे देवा, अखेर भारतात इबोलाची एंट्री!  title=

नवी दिल्ली: भारतात इबोलाचा पहिला पेशंट आढळलाय, लायबेरियाहून १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत परतला होता, सध्या या पेशंटला वेगळं ठेवण्यात आल्याची माहिती.

हा रुग्ण ज्या दिवशी भारतात आला तेव्हापासूनच त्याला इबोलाची लक्षणं दिसत होती. १० तारखेपासून त्याच्या विविध चाचण्या केल्यावर आज त्याला इबोला झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. हा रुग्ण पुढचे तीन महिने दिल्ली विमानतळावर इबोलासाठी बनवण्यात आलेल्या एका वॉर्डात राहील.

इबोला हा संसर्गजन्य रोग आहे. शरीरातून बाहेर येणाऱ्या कुठल्याही द्रव्यातून त्याचा संसर्ग होऊ शकतो.  भारतासारख्या देशांना या रोगाचा खूप मोठा धोका आहे.
 
दरम्यान या रुग्णाला लायबिरियाच्या सरकारनं इबोला मुक्त असल्याचा सर्टिफिकेट दिलं होतं. हा रुग्ण भारतात आल्यावर त्याच्या तीन रक्ताच्या चाचण्याही निगेटिव्ह आल्या होत्या. पण या रुग्णाच्या मूत्र आणि वीर्यात मात्र इबोलाचा विषाणू कायम राहिला होता असं आता समोर आलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.