नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६५ वर्षे झालीत. १७ सप्टेंबर या मोदींच्या जन्मदिनानिमित्ताने भाजपच्या नेत्यांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी यांनी शुभेच्छा दिल्यात. मात्र, केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री मेनका गांधी यांनी मोदींना एक खास गिफ्ट दिले.
मेनका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्ताने एक दुर्मिळ झाडाचे रोप गिफ्ट दिले. या झाडाला 'लोणी वाटी' म्हणून ओळखले जाते. मेनका गांधी यांनी आपल्या विश्वासू व्यक्तीला दिल्लीतून डेहराडूनला पाठविले. गिफ्ट शोधणे कठीण काम होते. यासाठी काही वेळ द्यावा लागणार होता. त्यासाठी खास व्यक्तीला दिल्लीतून उत्तराखंड येथे पाठविले.
या वृक्षाची एक वेगळी कथा आहे. भगवान श्रीकृष्ण लहानपणी दही चोरुन खायचा. त्यावेळी त्याला आई यशोदा हिची भिती वाटायची. त्यावेळी श्रीकृष्णाने या झाडाच्या पानाची वाटी (वाडगा) करुन त्यात दहीभरून झाडाला बांधले. त्यानंतर या झाडाची पाने वाटीप्रमाणे झालीत. त्यामुळे या झाडाला झाडाला 'लोणी वाटी' असे संबोधले गेले. या झाडाची पाने तोडली तर त्यातून येणारा चिक लोण्याप्रमाणे गोड लागतो.
असे सांगितले जाते की, पंतप्रधान मोदी श्रीकृष्णची जन्मभूमी गुजरात मानली जाते. याच भूमीतील मोदी आहेत. त्यांना लोणी, दही खूप आवडते. त्यामुळे मेनका गांधी यांनी त्यांना हे गिफ्ट दिले
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.