इंफाळ : भाजपाचे संसदीय पक्षाचे नेते एन. बिरेन सिंग यांनी आज मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मणिपूरमध्ये पहिल्यांदाचं भाजपचं सरकार सत्तेत आले आहे तर ईशान्य कडील तिसऱ्या राज्यात आता भाजपची सत्ता आली आहे.
राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. गोव्यात दुसऱ्या क्रमांकाच्या भाजपाची सत्ता स्थापन झाल्यानंतर आज मणिपूरमध्ये भाजपनं सत्ता स्थापन केली.
ईशान्येकडच्या राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थापन होणारं हे तिसरं सरकार आहे. ईशान्येकडील भाजपचं सरकार नसलेले आता केवळ चार राज्ये राहिली आहेत. 21 आमदार असलेल्या भाजपाला नागा पिपल्स फ्रंट आणि अपक्ष आमदारांसह संख्याबळ 32 झाल्याचा भाजपानं दावा केला.