नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये भूस्खलन झालंय.. यात हजारो भावीक अडकलेत. महाराष्ट्रातील सुमारे दीड हजार भाविकांचाही त्यात समावेश आहे.
यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील भाविकांचाही संख्या मोठी आहे.. या भाविकांबद्दल अधीक माहितीकरिता त्यांच्या नातेवाईकांनी 02472-225618 / 227301 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
विष्णूप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात हे भूस्खलन झालंय.. या भागात सुमारे 15 हजार लोक अडक्याची प्राथमिक माहिती मिळतीये.. दरम्यान भूस्खलनामुळे रस्त्यांचं मोठं नुकसान झालंय.
दगड मातीचे ढिकारे रस्त्यावर पडल्याने बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक बंद केलीये.. ही वाहूक पूर्ववर होण्यास वेळ लागणार आसल्याचं प्रशानाकडून सांगण्यात येत आहे.
चार धाम यात्रेला सुरुवात झाल्याने उत्तराखंडमध्ये मोठ्याप्रमाणात भाविकांची गर्दी आहे.. चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागातून 9 किलोमीटर अंतरावर हे भूस्खलन झालंय. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे.