landslide

उत्तराखंडवर पुन्हा संकट; उत्तरकाशीत बोगद्याचा भाग कोसळला, 50 कामगार आत अडकले

Landslide In Uttarkashi: उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्यात भूस्खलन झाले आहे. या बोगद्यात 50 हून अधिक मजूर अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्यातील मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सध्या सुरु आहे.

Nov 12, 2023, 11:49 AM IST

माथेरानच्या पायथ्याशी शेतांमध्ये 50 ते 100 फूट लांब भेगांमुळं दहशतीचं वातावरण

Irshalwadi Landslide : इरसालवाडी दरड दुर्घटनेची दहशत पाठ सोडत नाही तोच आणखी एका घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाळी सहलीसाठी अनेकांच्या आवडीचं ठिकाण असणाऱ्या माथेरानमध्ये सध्या यामुळं भीतीचं वातावरण आहे. 

 

Jul 27, 2023, 07:27 AM IST

आम्ही मेल्यावर पुनर्वसन करणार का? दरड कोसळत असल्याने महाडवासियांचा उद्विग्न सवाल

Raigad Landslide : राज्यात सुरु असलेल्या मुसरळधार पावसामुळे रायगडच्या अनेक भागात दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच महाडच्या मोहोत ग्रामस्थांनी त्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारला सवाल केला आहे.

Jul 25, 2023, 09:12 AM IST

मोठी बातमी! अंधेरीत मध्यरात्री दरड कोसळली; घरांमध्ये शिरले मातीचे ढिगारे

Mumbai News : रायगडमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतून आतापर्यंत 27 मृतदेह हाती लागले आहेत. तर अद्याप अनेकजण बेपत्ता आहेत. अशातच मुंबईतही दरड कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Jul 25, 2023, 07:36 AM IST

इरसालवाडी येथे भयानक स्थिती! दुर्गंधी आणि मृतदेहांचं विघटन सुरू झाल्यानं शोधकार्य थांबवले

इरसालवाडी दुर्घटनेतील शोधकार्य थांबवण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. अद्याप 57 जण बेपत्ता आहेत.

Jul 23, 2023, 09:53 PM IST

इरसालवाडीतील 78 जण अद्यापही बेपत्ता; संध्याकाळी शोधकार्य थांबवण्याची शक्यता

Irshalwadi landslide : रायगडमधील भूस्खलनात संपूर्ण इरसालवाडी गाडली गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्यातून आतापर्यंत 27 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच 78 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

Jul 23, 2023, 08:24 AM IST

दोन वर्षांपासून तळीयेतील गावकरी कंटेनरमध्येच; घरांचे बांधकाम अद्यापही अपूर्णच

Taliye Landslide : इरसालवाडीतील दुर्घटनेनं 2021 साली झालेल्या तळिये दरड घटनेची आठवण करुन दिली आहे. दोन वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेत 87 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र या दरडग्रस्तांची आजही परवड सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेली दोन वर्षे तळियेतील गावकऱ्यांवर ऊन, वारा पाऊस झेलत कंटेनरमध्ये राहण्याची वेळ आली आहे.

Jul 22, 2023, 11:49 AM IST

इरसालवाडी दुर्घटना! पनवेलच्या निसर्गमित्रची बचावकार्यात मदत, प्रतीकुल परिस्थितीवर मात करत लोकांना वाचवलं

रायगड जिल्ह्यातील खालापूर इथल्या इरसालवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर गेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु होतं, यात एनडीआरएफ आणि टीडीआरएफबरोबरच ग्रामस्थ आणि अनेस स्वंयसेवी संस्थाही सहभागी झाले होते.

Jul 21, 2023, 10:08 PM IST

'त्या' गोष्टीची खंत वाटली! इरसालवाडीत दिवसभर थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला मन हेलावणारा अनुभव

इरसालवाडीत आज सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आता वीसवर गेली आहे. घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलं. यावेळी राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील कुटुंबांचं स्थलांतर करुन कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा घोषणा मुख्यमंत्र्यानी केली.

Jul 21, 2023, 05:43 PM IST

एक होतं इरसालवाडी... एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आणणारी भयानक दुर्घटना

कुणाचा मुलगा, मुलगी, कुणाची सून ,कुणाची आई, तर कुणाचं लेकरु ढिगा-याखाली गाडले  गेले. काळरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात अनेकांचं जगणं संपलं आणि जे वाचले  त्यांच्या जगण्याचा अक्षरशः चिखल झाला आहे.  

Jul 20, 2023, 11:04 PM IST