close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्यापारी लालजीभाई पटेल यांनी ६ हजार कोटी जमा केले?

व्यापारी लालजीभाई पटेल यांनी ६ हजार कोटी जमा केले? असा मेसेज व्हॉटस अॅपवर फिरतोय. मात्र व्हॉटस अॅपवर जे काही मेसेजेस फिरतात, ते सर्व सत्यच असतात असं नाही, याची जाणीव आता सर्वांना झाली आहे. 

Updated: Nov 15, 2016, 04:39 PM IST
व्यापारी लालजीभाई पटेल यांनी ६ हजार कोटी जमा केले?

सुरत : व्यापारी लालजीभाई पटेल यांनी ६ हजार कोटी जमा केले? असा मेसेज व्हॉटस अॅपवर फिरतोय. मात्र व्हॉटस अॅपवर जे काही मेसेजेस फिरतात, ते सर्व सत्यच असतात असं नाही, याची जाणीव आता सर्वांना झाली आहे. 

कारण मोदींचा सूट लिलावात करोडो रूपयांना खरेदी करणाऱ्या, लालजीभाई पटेल यांनी आयकर विभागाकडे ६ हजार कोटी रूपये जमा केले नसल्याचं, खुद्द लालजीभाई पटेल यांनी म्हटलं आहे.

ज्या लालजी भाई पटेल यांनी पैसे भरले नसल्याचा दावा केला आहे, या लालजीभाई यतुलसीभाई पटेल यांनी लिलावात ४ कोटी ३१ लाख ३१ हजार ३११ रुपये मोजून मोदींचा कोट खरेदी केला होता.

व्हॉटस अॅपवर फिरणारा मॅसेज हा लालजीभाई पटेल बिल्डर या नावाने फिरतोय, माझा हिऱ्यांचा व्यापार असल्याचं लालजीभाई पटेल यांनी म्हटलं आहे, तसेच मोदींचा कोट मी विकत घेतला होता, म्हणून माझ्या विरोधात हे षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.