मिशेल ओबामांची भारतीय डिझायनरला पसंती

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी भारत दौऱ्यावर येताना भारतीय ड्रेस डिझायनरलाच पसंती दिली. भारतीय डिझायनर बिभू महापात्र यांनी डिझाइन केलेला नी लेंथचा त्यांनी पोषाख परिधान केला होता.

PTI | Updated: Jan 25, 2015, 06:17 PM IST
मिशेल ओबामांची भारतीय डिझायनरला पसंती   title=

नवी दिल्ली: अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी भारत दौऱ्यावर येताना भारतीय ड्रेस डिझायनरलाच पसंती दिली. भारतीय डिझायनर बिभू महापात्र यांनी डिझाइन केलेला नी लेंथचा त्यांनी पोषाख परिधान केला होता.

एअरफोर्स वनमधून उतरताना मिशेल यांनी हा फुलांचं प्रिंट असलेला ड्रेस परिधान केला होता. त्यावरच या प्रिंटेड ड्रेसला मॅचिंग कोटही घातला होता.
 
ड्रेस डिझायनर बिभू महापात्र हे मूळचे ओडिशाच्या राऊरकेलाचे आहेत. मात्र सध्या ते न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले आहेत.

Photoset: The President and First Lady arrive in India. The First Lady, Michelle Obama is wearing a dress... http://t.co/ELDoqAi7YR

— Bibhu Mohapatra (@BibhuMohapatra) January 25, 2015

महापात्र यांनी ट्विटरवरुन मिशेल यांनी परिधान केलेल्या ड्रेसचे फोटोज शेअर केले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.