श्रीनगरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला, एक जखमी

श्रीनगरच्या संतनगरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. हा हल्ला लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आला आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. संपूर्ण परिसराला सैन्याने घातला वेढा असून अतिरेकी लपल्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे.

Updated: Sep 28, 2013, 03:03 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, श्रीनगर
श्रीनगरच्या संतनगरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. हा हल्ला लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आला आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. संपूर्ण परिसराला सैन्याने घातला वेढा असून अतिरेकी लपल्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे.
श्रीनगरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला झालाय. लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने तणावाचे वातावरण आहे.
लष्करी जवानाच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर श्रीनगर येथे पुन्हा शनिवारी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हा गोळीबार केला आहे. संतनगर मार्गावर दुपारी हा प्रकार घडला.
या हल्ल्यात भारतीय नागरीक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. सैन्याने परिसराला वेढा घातला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.