पणजी : काँग्रेसचे विश्वजीत राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. काँग्रेस नेतृत्वाशी झालेल्या वादातून त्यांनी हा राजीनामा दिलाय.
आज विश्वासदर्शक ठरावावेळी विश्वजित राणे गैरहजर होते. 22 विरुद्ध 16 मतांनी पर्रिकारांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.
काँग्रेसच्या 17 आमदारांपैकी विश्वीजीत राणे मतदानावेळी गैरहजर राहिले. व्हिप डावलून त्यांनी अप्रत्यक्षरित्या मनोहर पर्रिकरांना मदत केलीये.
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता विश्वजित राणे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगलीये.