धारवाड : ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची अज्ञातांनी हत्या केली आहे. आज धारवाडच्या कल्याण नगरमध्ये ही घटना घडली. कन्नड विद्यापीठाचे कुलगुरू कलबुर्गी यांच्यावर सकाळी दुचाकीवरून आलेल्या बंदुकधारी व्यक्तींनी गोळ्या झाडल्या.
अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यानंतर आणखी एका पुरोगमी विचारवंताची हत्या झाल्याने सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने डॉ. कलबुर्गी यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. याबरोबरच त्यांना कर्नाटक सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार, नृपतुंगा पुरस्कार आणि पांपा पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.
कलबुर्गी यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील यारागल गावात १९३८ मध्ये झाला होता. कर्नाटक विद्यापीठाचे ते माजी कुलगुरु होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.