`देशाला ४ महिन्यात खरोखर चांगले दिवस येतील`, मोदींची पंतप्रधानांना कोपरखळी

नवी दिल्लीत अनिवासी भारतीयांच्या संमेलनात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी यावेळी बोलतांना पंतप्रधानांना कोपरखळी मारली आहे.

Updated: Jan 9, 2014, 01:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नवी दिल्लीत अनिवासी भारतीयांच्या संमेलनात नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी यावेळी बोलतांना पंतप्रधानांना कोपरखळी मारली आहे.
देशाला खरोखर आता चांगले दिवस येतील, आणि खरोखर चांगले दिवस येण्यासाठी फक्त चार महिने थांबा. यापूर्वी अनिवासी भारतीयांच्या संमेलनात बोलतांना पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी देशाचा चांगले दिवस येणार असल्याचं म्हटलं होतं.
देशातील उर्जेला आज दिशा देण्याची गरज असल्याचंही यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. अनिवासी भारतीयांचं ज्ञान,अनुभव त्याचा वापर करण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की, देशाला आता खरोखर चांगले दिवस येणार आहेत. आज देशात विकासाच्या मुद्यावर स्पर्धा सुरू आहे.
ब्रॅण्ड इंडियाला आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊ, एक भारत, समृद्ध भारतावर त्यांनी खास जोर दिला आणि सांगितलं की भारतात विकासाला नव्या दिशा देण्याची गरज आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.