तरुणाच्या अनोख्या युक्तीमुळे संपूर्ण गाव झालं 'मच्छर फ्री'

एका तरुणानं आपल्या अनोख्या पण अगदी सोप्या पद्धतीनं गावभरचे पोतंभर मच्छरांचा नष्ट केलंय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको. 

Updated: Jan 28, 2016, 12:39 PM IST
तरुणाच्या अनोख्या युक्तीमुळे संपूर्ण गाव झालं 'मच्छर फ्री' title=

उदयपूर : एका तरुणानं आपल्या अनोख्या पण अगदी सोप्या पद्धतीनं गावभरचे पोतंभर मच्छरांचा नष्ट केलंय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको. 

होय, असं घडलंय.... उदयपूरच्या भीलवाडा जिल्ह्यातील ठाणा गावच्या दुर्गेश व्यास नावाच्या एका तरुणानं हे काम करून दाखवलंय. त्यामुळे मच्छरांच्या भीतीनं धास्तावलेल्या सगळ्या गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. 

मलेरिया आणि डेंग्युसारख्या भयंकर आजारांपासून वाचण्यासाठी दुर्गेशनं एक साधं आणि सोप्पं काम केलं. त्यानं आपल्या घरच्या शौचालयाच्या गॅस पाईपला वरच्या बाजुनं एक थैली बांधली. 

यामुळे, पाईपमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे अनेक मच्छर त्यात अडकत गेले आणि नष्ट होत गेले. दुर्गेशनं जेव्हा थैली उघडली तेव्हा त्यात पिशवी भरून मृत मच्छर निघाले. 

त्यानंतर दुर्गेशचा हा अनोखा फंडा सगळ्या गावानंच अंमलात आणण्याचा निर्णय घेतला... आणि त्याचा परिणाम म्हणून सगळ्या गावातूनच मच्छर जवळपास हद्दपार होत गेले. गावातील साथीचे रोगही हद्दपार झाले. गावातील ७० टक्के घरांवर आजही गँस पाईपवर थैल्या बांधलेल्या दिसत आहेत.