गँगरेप प्रकरणी प्रचंड आंदोलन, सरकार खडबडून जागे

दिल्लीकरांचा आक्रोशाचा उद्रेक झाला आहे. गँगरेपनंतर संपूर्ण दिल्लीत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. आजही लाखो दिल्लीकरांनी इंडिया गेट आणि रायसीना हिलवर आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

Updated: Dec 22, 2012, 11:36 AM IST

www.24taas.com, नवी दि्ल्ली
दिल्लीकरांचा आक्रोशाचा उद्रेक झाला आहे. गँगरेपनंतर संपूर्ण दिल्लीत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. आजही लाखो दिल्लीकरांनी इंडिया गेट आणि रायसीना हिलवर आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारले जातायेत... मात्र गँगरेप नंतर महिलांच्या सुरक्षेवर आंदोलनाचा भडका उडाला आहे. आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अश्रूधुरांचाही वापर केला जात आहे.
दिल्ली गँगरेपच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सरकारनं आता सुरक्षेच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केलीये. दिल्लीतल्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांची गस्त सुरु आहे.
संशयास्पद वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी केली जातेय. दिल्ली सामाजिकदृष्ट्या सुरक्षित बनवण्यावर भर दिला जात आहे. केंद्रीय गृहसिचव आर के सिंह यांनी सुद्धा काल रात्री दिल्लीतल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला स्वतः आर के सिंह दिल्लीच्या रस्त्यावर उतरले होते.
त्यांनी दिल्लीतल्या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत दिल्ली पोलिसांतील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.