दिल्लीत आणखी एक दुष्कृत्य, ४० वर्षीय महिलेवर गँगरेप

राजधानी दिल्लीत आणखी एक गँगरेपची (सामूहिक बलात्कार) घटना समोर आली आहे. दिल्लीतील वेल्कम भागातील तीन लोकांनी ४० वर्षीय एका महिलेवर कथन स्वरूपात सामूहिक बलात्कार केला आहे.

Updated: Dec 22, 2012, 09:42 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत आणखी एक गँगरेपची (सामूहिक बलात्कार) घटना समोर आली आहे. दिल्लीतील वेल्कम भागातील तीन लोकांनी ४० वर्षीय एका महिलेवर कथन स्वरूपात सामूहिक बलात्कार केला आहे. चार मुलांची आई असणाऱ्या या महिलेसोबत हे कृत्य तिच्या राहत्या घरात झाले.
पोलिसांनी ४६ वर्षीय गफ्फार या एका आरोपीला अटक केली आहे. तर दोन जण फरार आहेत. फरारी असणाऱ्या एका आरोपीची ओळख महिलेने केली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित महिला जवळजवळ १ वर्षापासून भाड्याच्या घरात राहत आहे. तर तिचा संपूर्ण परिवार न्यू उस्मानपूर भागात राहतात.
पोलिसांच्या मते, आरोपींनी महिलेच्या घरात प्रवेश करून तिला कामोत्तजक पेयपदार्थ जबरदस्तीने पिण्यास भाग पाडले. आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.