'मुहम्मद अली हे केरळचे खेळाडू'

केरळचे क्रीडामंत्री इ पी जयराजन यांनी, जगप्रसिद्ध मुष्टियोद्धे मुहम्मद अली हे केरळ राज्याचे होते, असे विनोदी विधान केले आहे. जयराजन यांनी क्रीडा मंत्रालयाची सूत्रे नुकतीच हाती घेतली आहेत. 

Bollywood Life | Updated: Jun 5, 2016, 10:49 PM IST
'मुहम्मद अली हे केरळचे खेळाडू' title=

तिरुअनंतपूरम : केरळचे क्रीडामंत्री इ पी जयराजन यांनी, जगप्रसिद्ध मुष्टियोद्धे मुहम्मद अली हे केरळ राज्याचे होते, असे विनोदी विधान केले आहे. जयराजन यांनी क्रीडा मंत्रालयाची सूत्रे नुकतीच हाती घेतली आहेत. 

अली यांच्या मृत्युसंदर्भात येथील स्थानिक वृत्तवाहिनीकडून त्यांना प्रतिक्रियेसाठी विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

'अली हे केरळचे प्रतिथयश क्रीडा व्यक्तिमत्त्व होते, आणि त्यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकामुळे जगभरात केरळची कीर्ती झाली आहे, असे हे जयराजन म्हणाले. जयराजन यांच्या या प्रतिक्रियेचे सोशल मिडियावर मोठे पडसाद उमटले आहेत.

जयराजन हे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. 'मुहम्मद अली यांचे अमेरिकेत निधन झाल्यासंदर्भातील बातमी मी आताच ऐकली, असे जयराजन यांनी सांगितले.