समाजवादीची काँग्रेसला 'ऑफर', मुलायम PM तर राहुल Deputy PM

समाजवादी पार्टीने काँग्रेसला 'ऑफर' देऊ केली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी अट लागू केलेय. जर मुलामयसिंह यादव यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यास काँग्रेस तयार असेल तर आम्ही त्यांच्याशी आघाडी करु, असे असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. 

PTI | Updated: Dec 4, 2015, 11:22 PM IST
समाजवादीची काँग्रेसला 'ऑफर', मुलायम PM तर राहुल Deputy PM   title=

नवी दिल्ली : समाजवादी पार्टीने काँग्रेसला 'ऑफर' देऊ केली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी अट लागू केलेय. जर मुलामयसिंह यादव यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यास काँग्रेस तयार असेल तर आम्ही त्यांच्याशी आघाडी करु, असे असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. 

लोकसभेच्या पुढील निवडणुकीत जर मुलामयसिंग यादव यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यास काँग्रेस तयार असेल, तर आम्हाला त्यांच्याशी आघाडी करण्यात काहीच हरकत नाही, असे अखिलेश यादव यांनी म्हणालेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान समाजवादी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना अखिलेख यांनी हे जाहीर करताना म्हटले.

मुलायमसिंग पंतप्रधान आणि राहुल गांधी यांना उप-पंतप्रधान केले जाणार असेल तर मी अगदी आत्ता, या क्षणीही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार आहे. मात्र त्याचवेळी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत बिहारप्रमाणे महाआघाडीसारखी मोट बांधण्याची समाजवादी पक्षाला गरज भासणार नाही, असा दावा त्यांनी केला. 

दरम्यान, भविष्यात भाजपशी कधीही युतीची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.