मुस्लिम युवकाने हनुमान चालिसा केला उर्दुत भाषांतरीत

 श्रीमद भगवत गीतेनंतर आता हनुमान चालिसा उर्दूमध्ये वाचता येणार आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका मुस्लिम युवक आबिद याने हनुमान चालिसा उर्दूत भाषांतरीत केले आहे. 

Updated: Aug 10, 2015, 07:16 PM IST
मुस्लिम युवकाने हनुमान चालिसा केला उर्दुत भाषांतरीत title=

लखनऊ :  श्रीमद भगवत गीतेनंतर आता हनुमान चालिसा उर्दूमध्ये वाचता येणार आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका मुस्लिम युवक आबिद याने हनुमान चालिसा उर्दूत भाषांतरीत केले आहे. 

आबिदने सांगितले की, त्याने हनुमान चालिसाचे मुसद्दस शैलीत भाषांतर केले आहे. 'मुसद्दस' मध्ये तीन शेर आणि सहा लाइन्स असतात. तर चौपाईमध्ये चार लाइन्स असतात. 

आबिद अल्वी आता हनुमान चालिसानंतर शिव चालिसा उर्दूत भाषांतरीत करणार आहे. हनुमान चालिसाला हिंदीतून उर्दूत भाषांतरीत करण्यासाठी तीन महिने लागले. आबिदचा विश्वास आहे की, त्याच्या या कामामुळे दोन्ही समुदायातील लोग एक दुसऱ्याच्या संस्कृती आणि श्रद्धेबद्दल जाणून घेण्यास सोपे जाणार आहे. 

या उर्दू भाषांतरात एकूण १५ बंद आहे आणि प्रत्येकात सहा लाइन्स आहे. आबिदला नेहमी वाटत होतं की हिंदू आणि मुस्लिम समुदायाने एकमेकांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेतले पाहिजे. आबिदच्या मते, अनेक उर्दू पुस्तकांचे हिंदीत भाषांतर व्हायला हवे. असे झाल्यास एक दुसऱ्याबद्दल प्रेम निर्माण होण्यास मदत होईल. 

वाराणसीला गेला असताना आबिदला ही आयडीयाची कल्पना आली. त्याने काही परदेशी पर्यटकांना हनुमान चालिसा वाचताना पाहिले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.