नवी दिल्ली : भारतात मुसलमानांच्या संख्येत वाढ झाली आहे, मात्र मागील दशकाच्या तुलनेत 2001 ते 2011 या दशकात मुसलमानांच्या संख्या वाढीचा वेग मंदावला आहे.
भारताच्या लोकसंख्येचा आकडा लवकरच सार्वजनिक करण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जनगणनेच्या ताज्या आकडेवारीनुसार 2001 ते 2011 या दहा वर्षांत मुस्लिमांच्या लोकसंख्येत 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मागील दहा वर्षांमध्ये देशातील एकूण लोकसंख्येत मुस्लिमांची संख्या 13.4 टक्क्यांवरुन 14.2 टक्क्यांवर पोहोचली आहे. पण मुस्लिमांची संख्या वाढण्याची गती मंदावली आहे.
1991 ते 2001 या दशकात मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर 29 टक्के होता, पण 2001-2011 मध्ये यात घसरण झाली आहे. घसरणीनंतरही वाढीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे, जो मागील दशकात 18 टक्के होता.
पश्चिम बंगालही असं राज्य आहे, जिथे अवैध प्रवाशांची समस्या मोठी आहे. या राज्यातील मुस्लिम लोकसंख्येतही 1.9 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. 2001 मध्ये पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्या 25.2 टक्के होती, जी दहा वर्षांनंतर म्हणजेच 2011 मध्ये वाढून 27 टक्के झाली. ही टक्केवारी राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास दुप्पट आहे.
मुस्लिमांची सर्वाधिक संख्या आसाममध्ये वाढली आहे. 2001 च्या जनगणनेवर नजर टाकल्यास आसाममध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 30.9 टक्के होती, ज्यात दहा वर्षांमध्ये वाढ होऊन 34.2 टक्के झाली आहे. या राज्यात बांग्लादेशी घुसखोरांची मोठ्या समस्या आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.