close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हिडिओ: गाईला वाचविण्यासाठी मुस्लिम तरुणाची विहिरीत उडी

दिल्लीतील दादरी भागात गोमांस खाल्ल्याच्या अफवेनंतर ५० वर्षीय मुस्लिम व्यक्ती अखलाकच्या हत्येनं संपूर्ण देश हादरलाय. असं असतांना लखनऊमध्ये एका मुस्लिम तरुणानं गाईचा जीव वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मोहम्मद झाकी असं या २० वर्षीय तरुणाचं नाव आहे. 

Updated: Oct 6, 2015, 09:17 AM IST
व्हिडिओ: गाईला वाचविण्यासाठी मुस्लिम तरुणाची विहिरीत उडी

लखनऊ: दिल्लीतील दादरी भागात गोमांस खाल्ल्याच्या अफवेनंतर ५० वर्षीय मुस्लिम व्यक्ती अखलाकच्या हत्येनं संपूर्ण देश हादरलाय. असं असतांना लखनऊमध्ये एका मुस्लिम तरुणानं गाईचा जीव वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मोहम्मद झाकी असं या २० वर्षीय तरुणाचं नाव आहे. 

आणखी वाचा - हिंदू भक्तांनी केली मुस्लिम महिलेला गणपती मंदिरात 'प्रसुती'साठी मदत

मोहम्मद झाकी यानं आपल्या पॉलिखेडा या गावातील ३५ फूट खोल विहिरीत गाय पडल्याचं पाहिलं. मग क्रेनची वाट न पाहताच तो थेट विहिरीत उतरला... त्याचवेळी इतर गावकऱ्यांनी मागवलेली क्रेनही आली. मग क्रेनच्या साहाय्यानं मोहम्मद झाकीनं गाईला बाहेर काढलं.

आणखी वाचा - अखलाकनं स्वत:च्या बचावासाठी अखेरचा फोन केला हिंदू मित्राला

त्याच्या या मदतीचा व्हिडिओ यूट्यूबवर वायरल झालाय. सर्वत्र मोहम्मद झाकीच्या या कामाचं कौतुक होतंय. यामुळं कट्टरवाद्यांना चांगलीच चपराक मिळालीय. 

पाहा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.