Must Read ! हा रेल्वे प्रवास जो तुमच्या नेहमी लक्षात राहिल

ही घटना आहे १९९० सालची

Updated: May 26, 2016, 10:18 PM IST
Must Read ! हा रेल्वे प्रवास जो तुमच्या नेहमी लक्षात राहिल title=

मुंबई : ही घटना आहे १९९० सालची. आसामच्या २ मैत्रीणी रेल्वे भर्तीसाठी गुजरातला निघाल्या. प्रवासात एका स्थानकावर गाडी बदलून त्यांना पुढचा प्रवास करायचा होता. पण पहिल्या गाडीत काही मुलांनी त्यांची छेड काढल्यामुळे त्या थोड्या घाबरल्या होत्या. पण दुसऱ्या गाडीत तरी असं काही होवू नये म्हणून त्या देवाला प्रार्थना करत होत्या. दोन्ही मैत्रीणी स्टेशनवर उतरल्या आणि रिजर्वेशन यादीमध्ये आपलं नाव शोधू लागल्या. पण त्यांचं रिजर्वेशन कन्फर्म झालं नव्हतं.

निराश झालेल्या या मैत्रीणींनी टीसीकडे जागा मिळावी यासाठी विनंती केली तर टीसीने ही गाडी आल्यावर जागा देण्याचं आश्वासन दिलं. गाडी आली आणि दोन्ही मैत्रीणी यांना जागा मिळाली पण समोर बघतात तर काय इथेही २ पुरुष त्यांच्यासमोर बसले होते. आता त्यांच्याकडे दुसरा पर्याय ही नव्हता आणि मनात भीती ही होती.

टीसीला पुन्हा त्या दोघी शोधू लागल्या कारण त्यांना दुसरी जागा हवी होती. काही वेळात टीसी आला आणि या काही सांगतील या आधीच टीसीने त्यांना सांगितलं की तुम्हाला ही सीट सोडावी लागेल कारण याचं रिजर्वेशन पुढच्या स्थानकावर आहे. हे ऐकताच दोघांच्या चिंता आणखी वाढल्या कारण रात्रीचा प्रवास त्यांना करायचा होता. ते २ पुरुष ही गोष्ट पाहत होते. त्यांचं या मैत्रीणींकडे लक्ष होतं. पुढचं स्टेशन येताच ते दोघं पुरुष उठले आणि तेथून निघून गेले. त्यानंतर या दोन्ही मैत्रीणी त्यांच्या जागेवर जाऊन बसल्या.

गाडी सुरु झाली होती. काही वेळेत ते २ पुरुष पुन्हा तेथे आले आणि काहीही न बोलता खाली झोपले. हे पाहून त्या दोघीही अचंबित झाल्या पण त्यांच्या मनात भीती कायम होती. सकाळी चहावाला आला त्यानंतर त्या झोपेतून जाग्या झाल्या. त्यानंतर त्यांनी या दोन्ही पुरुषांचे आभार मानले. त्यातील एका पुरुषाने म्हटलं की 'बहिण तुला जर कोणतीही मदत लागली तर नक्की सांग.' त्यानंतर एकीने वही काढली आणि त्यांचं नाव आणि संपर्क विचारला. 

'आमचं स्टेशन आलं' असं सांगून ते दोघेही पुरुष स्टेशनवर उतरले आणि गर्दीत गायब झाले. त्या वहीत जी दोन नावं होती ती म्हणजे आताचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शंकर सिंह वाघेला यांचं. यामधली एक मैत्रीण सध्या रेल्वेमध्ये जनरल मॅनेजर या पोस्टवर कार्यरत आहे.

हा लेख 'द हिंदू' या इंग्रजी पेपरमध्ये 'A train journey and two names to remember' या नावाने १ जून २०१४ ला प्रकाशित झाला होता.