www.24taas.com, नवी दिल्ली
देशाला स्वातंत्र्य मिळून सहा दशके झाली, मात्र अजूनही देशात सुराज्य आलेलं नाही, असं सांगत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आज तरुणाईला साद घातली.
दिल्लीत श्रीराम कॉलेजमध्ये तरुणांशी सवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. सध्या भ्रष्टाचारामुळे देशात निराशाजनक वातावरण आहे, व्यवस्थेवर जनता नाराज आहे. हे बदलण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा एकत्रित विकास होण्याची गरज व्यक्त करतानाच त्यांनी गुजरातमध्ये केलेल्या विकासकामांची उदाहरणेही तरुणांना सांगितली. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करणे, हे सर्वात मोठे आव्हान असल्याचं त्यांनी म्हटलय.
देशात सध्या 65 टक्के तरुण आहेत. या तरुणांच्या स्वप्नातला देश साकारण्यासाठी नव्या दृष्टीकोनाची गरजही त्यांनी व्यक्त केली. एकीकडे हा संवाद सुरु सताना दुसरीकडे मात्र मोदींच्या विरोधात बाहेर निदर्शनं सुरु होती.