नरेंद्र मोदींनी केलं आधुनिक शस्त्रास्त्रपुजन

विजयादशमीनिमित्त गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीही शस्त्रपूजन केलं. सुरक्षा दलांच्या शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमात मोदींनी हे पूजन केलं. यावेळी सर्व आधुनिक शस्त्रसामग्री पूजनात ठेवण्यात आली होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 13, 2013, 04:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गांधीनगर
विजयादशमीनिमित्त गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीही शस्त्रपूजन केलं. सुरक्षा दलांच्या शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमात मोदींनी हे पूजन केलं. यावेळी सर्व आधुनिक शस्त्रसामग्री पूजनात ठेवण्यात आली होती.
विजयादशमी निमित्त संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात संघाचा दरवर्षी मोठा सोहळा होतो. या उत्सवाच्या निमित्ताने संघ सरसंघचालक येणाऱ्या वर्षाच्या संघाच्या भूमिकेचा जाहीरपणे उच्चार करतात. यंदा सरसंघचालकांनी सरकारला टीकेचं लक्ष्य केलं. पाक आणि चीनची घुसखोरी रोखण्यात सरकारला अपयश आल्याचं त्यांनी म्हटलंय.. याला सरकारचं मवाळ धोरण कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय डॉ.मनमोहन सिंग आणि शरीफ भेटीतून काय साध्य झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असून रुपयाचे सातत्याने होणारे अवमूल्यन चिंतेची बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय.. त्यामुळं आगामी निवडणूकीत १०० टक्के मतदान करुन योग्य उमेदवार निवडण्याचं आवाहन त्यांनी केलंय..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.