नवी दिल्ली : भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यसभेत गदारोळ झाला. महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त आणि राष्ट्रवादी होते, असे खळबळजनक वक्तव्य खासदार साक्षी महाराज यांनी केलं आहे.
साक्षी महाराज यांनी आज राज्यसभेत वक्तव्य केल्यानंतर गोंधळ झाल्याने त्यांना आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले. आपण असे काही वक्तव्य केलेच नसल्याचे त्यांनी नंतर स्पष्ट केले.
साक्षी महाराजांच्या वक्तव्यावरून राज्यसभेत बोलताना काँग्रेस खासदार हुसेन दलवाई म्हणाले, "महाराष्ट्रात नथुराम गोडसे शौर्य दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाचे आमंत्रण देणाऱ्या व्यक्तींमध्ये दोन आमदारही आहेत. राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने शौर्य दिन साजरा केला जातो. या प्रकरणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे. सत्ताधारी भाजपशी संबंधित असलेल्या संघटनांमध्ये आग्रा शहरात बळजबरी धर्मांतर करण्यात आले आहे."
साक्षी महाराजांच्या वक्तव्यानंतर राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. त्यामुळे संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले, की महात्मा गांधींच्या मारेकऱ्याला पाठिंबा देण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. साक्षी महाराजांनी वापरलेली भाषा स्वीकारार्ह नसल्याचं मुख्तार अब्बास नकवी यांनी स्पष्ट केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.