www.24taas.com,बडोदा
गुजरातमधील बडोद्यात NCPच्या कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसला घटक संघटनेचा दर्जा दिला. त्यासाठी पक्षाच्या घटनेत तशी दुरूस्तीही करण्यात आली.
खासदार सुप्रिया सुळेंचं नेतृत्व पक्षात आक्रमकपणे पुढं आणलं जात आहे. युवती संघटनेच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंचं नेतृत्व पक्षात प्रस्थापित केलं जात आहे आणि आता राष्ट्रवादी युवती काँग्रेसला घटक संघटनेचा दर्जा देऊन त्यावर शिक्कामोर्तब झालंय.
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आलीये. बडोदा इथं सुरु असलेल्या पक्षाच्या कार्यकारिणीत पवारांची बिनविरोध निवड करण्यात आलीये. सलग पाचव्यांदा पवार यांची निव़ड करण्यात आलीये. या कार्यकारिणीच्या बैठकीत होणा-या ठरावांमधून पक्षाची आगामी वाटचालही स्पष्ट होणार आहे. याची चणूक दिसून आली आहे. सुप्रिया सुळे यांच्या युवतीचे संघटन म्हणून नामकरण झाले आहे. तेही महाराष्ट्राबाहेर.
सुळे या महाराष्ट्रात युवतींचे संघटन करण्यात गुंतल्या आहेत. आता राज्याच्याबाहेर त्यांचे नाव पुढे यायला हवे म्हणून राष्ट्रीय बैठकीत राष्ट्रवादी युवतीला संघटनेचा दर्जा देण्यात आला आहे, अशी कुजबूज आता सुरू झाली आहे. शरद पवारांचे सर्वकाही लेकीसाठी चालले आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
तसंच राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडण्यात येणा-या ठरवांतून काँग्रेस आणि युपीएबाबतची तर आर्थिक ठरावामधून राष्ट्रवादीची एफडीआयबाबत भूमिकाही स्पष्ट होणार आहे. त्यातच पवार यांनी मध्यावर्ती निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिल्याने राष्ट्रवादीची भूमिका या निमित्ताने स्पष्ट झाल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.