नवज्योतसिंग सिद्धू हॉस्पिटलमध्ये दाखल

भारताचे माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि रिएलिटी शो जज नवज्योतसिंग सिद्धू यांना दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Updated: Oct 6, 2015, 09:33 PM IST
नवज्योतसिंग सिद्धू हॉस्पिटलमध्ये दाखल  title=

नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि रिएलिटी शो जज नवज्योतसिंग सिद्धू यांना दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

सिद्धू यांच्या धमण्यांमध्ये एक गाठ असल्यामुळे त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले. 

काही न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या स्थितील डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) म्हणतात. योग्य वेळी त्यावर उपचार झाला नाही तर त्यांच्या जिविताला धोका उद्भवू शकतो. रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्यांमध्ये डीव्हीटी अडथळा निर्माण करू शकते, असे हॉस्पिटलने सांगितले. 

प्राथमिक उपचारानंतर सिद्धू यांच्या प्रकृती स्थिर आहे. सिद्धू यांना ब्लड थिनर्सवर ठेवण्यात आले आहे. ते लवकरच बरे होती, असे हॉस्पिटलने सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.