राज्या-राज्यातील नवरात्रौत्सव

श्री गणेशाला निरोप दिल्यानंतर आनंदाचे व सौख्याचे लेणं लेवून नवरात्र येते. देवीची पुजा करुन घटस्थापना होते व नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ होतो. आणि सोबतच सुरुवात होते ती दांडियाच्या जल्लोषाला !

Updated: Oct 8, 2013, 08:26 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
श्री गणेशाला निरोप दिल्यानंतर आनंदाचे व सौख्याचे लेणं लेवून नवरात्र येते. देवीची पुजा करुन घटस्थापना होते व नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ होतो. आणि सोबतच सुरुवात होते ती दांडियाच्या जल्लोषाला !
नवरात्रीच्या नऊ दिवस देवीच्या नऊ विविध रूपांच पुजन केलं जात. देशभरातील लोक हा सण अद्वितीय उत्साहाने साजरा करतात. महानगरमध्ये हा उत्सव अतिशय व्यावसायिक वाटतो. विविध प्रातांत नवरात्री साजरा करण्याचे मार्ग अतिशय पारंपरिक आणि भिन्न आहेत.
आपल्या भारत देशाची लांबी आणि रुंदी लक्षात घेता नवरात्रीचा हंगाम सुरू असतांना भारतातील विविध प्रातांना भेट देऊन औत्सुक्य अनुभवंण शक्य नाही. म्हणूनच येथे भारतातील विविध राज्यांतील नवरात्रीच्या शुभ नऊ रात्री साजऱ्या कशा होतात हे पाहूया.
तमिळनाडू
या द्रविडी राज्यात देवी दुर्गा, देवी लक्ष्मी व सरस्वती देवींचा या नऊ रात्री विशेष उत्सव असतो.अय्यर समुदायामधील महिला संध्याकाळी वैवाहिक महिलांना आमंत्रित करून त्यांना बांगडया,कर्णफूलं भेट म्हणून देतात. मसूरच्या बिया आणि डाळींपासून तयार केला जाणारा,सुंदल` नावाचा विशेष पदार्थ प्रत्येक दिवशी अतिथींना दिला जातो.काही लोक`गोलु` त्यांच्या घरासमोर दर्शनी भागात ठेवतात. `गोलू`ला नऊ पायऱ्यांची एक आरास केली जाते. प्रत्येक पायरी म्हणजे नवरात्रीचा प्रत्येक दिवसाचं प्रतीक. बहुतांश घरांमध्ये , `गोलू` साठी वापरल्या जाणाऱ्या बाहुल्या या अनुवांशिकतेनं उपलब्ध आहेत.
आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेश मध्ये नवरात्री दरम्यान` बटुकामा पंडुगामा’ या नावाने विशेषतः तेलंगाणा प्रदेशात,हा सण साजरा केला जातो.` बटुकामा पंडुगामा ` म्हणजे ` देवी जिवंत परत ये. हे नऊ दिवस शक्तिला समर्पित असतात. अतिशय अद्वितीय प्रकारे साजरे होतात. महिला बटुकामा म्हणजेच सात थरांमध्ये मध्ये हंगामी फुलंची, सुंदर रचना तयार करतात. बटुकामा तयार केल्यानंतर, महिला संध्याकाळी एका ठिकाणी जमतात. बटुकामाला केंद्रस्थानी ठेऊन त्या देवीची गाणी म्हणत नृत्य करतात.
केरळ
केरळमध्ये नवरात्रीचे केवळ शेवटचे तीन दिवस साजरे होतात. अष्टमी, नवमी आणि विजया दशमी,केरळींसाठी जास्त महत्त्वाचे आहेत. या दक्षिण भारतीय राज्यात या दिवशी शिक्षण आरंभ करणं सर्वात शुभ मानलं जातं. अष्टमीच्या दिवशी सरस्वती देवीच्या मूर्तीसमोर पुस्तके,वाद्य ठेऊन देवीची उपासना करतात.
कर्नाटक
कर्नाटकमध्ये यावर्षी ४०३ वा नवरात्री उत्सव साजरा केला जाईल. नवरात्री साजरा करण्याची परंपरा कर्नाटकचे राजे वाडियार यांनी १६१० मध्ये सुरू केली. राज्यातील लोक आजही त्याच ऐतिहासिक परंपरेने नवरात्री साजऱ्या करतात. या ऐतिहासिक परंपरेला` नाडा हब्बा ` म्हणतात. याउत्सवाचे कारण म्हणजे म्हैसूर रहिवासी दानव महिषासुरावर देवी दुर्गेचा विजय हे होय. यातील मुख्य आर्कषण म्हणजे रस्त्यावरील मिरवणूकीत हत्तींचा असलेला समावेश.
पश्चिम बंगाल
पूर्व भारतातील याराज्यात दुर्गा पूजा म्हणून नवरात्री खूपच अनोख्या रंगात साजऱ्या होतात. सातव्या दिवसपासून दुर्गादेवी पृथ्वीवर तिच्या माहेरी थेट स्वर्गातून येते अशी काहींची धारणा आहे.दुर्गादेवी आणि तिच्या मुलांसाठी सुंदर तंबु बांधण्यात येतात. देव आणि देवींकरीता हे तंबू त्यांची तात्पुरत्या स्वरूपाची निवासस्थानं असतात.
गुजरात
गुजरातमध्ये नवरात्री उत्सवा दरम्यान लोकांचा उत्साह अवर्णनीय असतो. एका भांडयांत पाणी भरून त्यात सुपारी आणि एक रौप्य नाणे ठेवले जाते त्यासमोर उत्साही आणि भव्य पोशाखांमधील महिला नृत्य करतात. गरबा महिलांसोबत पुरूषही नाचतात.
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील जनता नवरात्रात नवीन घर किंवा कार खरेदी किंवा कोणत्याही बाबीचा आरंभ करणं शुभ समजतात. महिला हळदी-कुंकू आयोजित करतात. महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत रास गरबा नृत्य केले जाते. आदीमाता अंबेची आरती, आराधना करुन चप्पल न घालता त्याभोवती स्त्री-पुरुष गरबा नृत्य करातात.
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशात अत्यंत भक्तीभावाने नवरात्री साजऱ्या होतात. नवरात्रीत लोक एकत्रितपणे देवीची प्रार्थना करतात. हा हिमाचलच्या हिंदूचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या सणाचा दहावा दिवस राज्यात कुलु दसरा म्हणून साजरा होतो. हिमाचली लोक हा दिवस प्रभू रामचंद्राच्या अयोध्येला परतण्याचा म्हणून साजरा करतात.
पंजाब
पंजाबी भाविक देवीसाठी उत्सवाचे पहिले सात दि