www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मीडियानं आपल्यासंबंधी नकारात्मक बातम्या देणं थांबवण्याचा आदेश देण्याचा आदेश देण्याची मागणी, सध्या तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूनं सर्वोच्च न्यायालयाकडे केलीय. सोळा वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापू सध्या तरुंगाची हवा खात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम यांची बाजू ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी मुख्य न्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या खंडपीठासमोर मांडली. माध्यमांनी अचूक वार्तांकन करण्यास कोणताही आक्षेप नाही, परंतु आसाराम यांचे आश्रम म्हणजे एक प्रकारचे वेश्या गृह असल्याची चित्रण करणारी वार्तांकनं माध्यमांनी थांबवावीत, असं सिंग यांनी यावेळी न्यायालयात म्हटलंय.
आसाराम आणि त्यांच्या मुलाबद्दल तसेच आश्रमातील नकारात्मक वार्तांकन माध्यमांनी थांबवावं, अशी मागणी आसारामच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी केलीय. या आश्रमांमध्ये सुमारे १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून अशा प्रकारच्या वार्तांकनाचा त्यांच्यावर आणि त्यांच्या भविष्यावर वाईट परिणाम होत असल्याची भूमिका सिंग यांनी यावेळी घेतली. यासंदर्भातील पुढील सुनावणी २१ ऑक्टोथबर रोजी होणार आहे.
आसाराम बापू आणि पुत्र नारायण साई दोघांच्याविरोधात आणखी एक बलात्काराचा गुन्हा सुरतला दाखल झालाय. यानंतर फरार झालेल्या साईविरुद्ध पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटिस जारी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.