नवी दिल्ली : ऑनलाईन रेस्टोरंट आणि फूड गाईड म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या झोमॅटोच्या जवळपास १ कोटी १७ लाख यूझर्सची महत्वपूर्ण माहिती चोरीला गेल्याचं उघड झाले आहे. त्यात झोमॅटो यूझर्सचे ईमेल आयडी, पासवर्डचा समावेश आहे.
सुदैवानं क्रेडीट कार्ड किंवा इतर सर्व पैशाच्या देवाणघेवाणीशी संबंधित माहिती सुरक्षीत असल्याचं झोमॅटोच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.
जगभरात वॉन्नक्राय रेन्समवेअरनं धूमाकूळ घातलेला असतानाच झोमॅटोमध्ये माहितीची चोरी झाल्यानं एकच घबराट पसलीय.
दरम्यान, ज्या यूझर्सची माहिती चोरीला गेलीय, अशा सर्वांचे पासवर्ड बदलून त्यांना मोबाईल अॅपमधून लॉगआऊट केल्याचे झोमॅटोनं म्हटले आहे.
त्याचप्रमाणे अशी चोरी पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचंही कंपनीने स्पष्ट केले आहे.