मेडिकलसाठीची 'नीट' परीक्षा यावर्षीपासूनच

मेडिकल प्रवेशासाठीची 'नीट' (NEET) परीक्षा यावर्षीपासूनच होणार आहे.

Updated: Apr 28, 2016, 05:45 PM IST
मेडिकलसाठीची 'नीट' परीक्षा यावर्षीपासूनच title=

नवी दिल्ली: मेडिकल प्रवेशासाठीची 'नीट' (NEET) परीक्षा यावर्षीपासूनच होणार आहे. सुप्रीम कोर्टानं याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. एआयपीएमटीच्या नावाने ही 'नीट'ची परीक्षा घेण्यात येणार आहे.

पहिली परीक्षा एक मे रोजी तर दुसरी परीक्षा 24 जुलैला होणार आहे. या परीक्षेचा निकाल 17 ऑगस्टला जाहीर होईल. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं मात्र विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. 

राज्याची वैद्यकीय पूर्व परीक्षा म्हणजे सीईटी आहे. त्यामुळं नेमकी कोणती परीक्षा द्यावी आणि त्याची प्रक्रिया काय असणार आहे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.