घराणेशाही बाद करून आता महापुरुषांच्या नावे योजना

सत्ता बदलानंतर योजनांचे नावंही बदलली जातात. काँग्रेस सरकारमध्ये जिथं नेहरू, गांधी यांच्या नावे जास्त योजना सुरू केल्या गेल्या. तर आता भाजपनं आपल्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांना दक्षिणेतील महापुरुषांची नावं दिली आहेत. 

Updated: Jul 10, 2014, 05:32 PM IST
घराणेशाही बाद करून आता महापुरुषांच्या नावे योजना title=

नवी दिल्ली: सत्ता बदलानंतर योजनांचे नावंही बदलली जातात. काँग्रेस सरकारमध्ये जिथं नेहरू, गांधी यांच्या नावे जास्त योजना सुरू केल्या गेल्या. तर आता भाजपनं आपल्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांना दक्षिणेतील महापुरुषांची नावं दिली आहेत. 

ज्या महापुरुषांच्या नावानं भाजपनं योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांची विचारधारा ही भाजपच्या विचारधारेसोबत जोडता येवू शकते. मदन मोहन मालवीय, लोकनायक जयप्रकाश, दीनदयाल उपाध्याय, सरदार पटेल, डॉ, श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नावानं या योजना असतील. 

पाहा कोणाच्या नावानं कोणती योजना:

1. दीनदयाल उपाध्याय - बजेटमध्ये दीनदयाल उपाध्याय यांच्या नावानं ग्रामीण भागांमध्ये दीनदयाल ज्योति योजना सुरू केली जाणार आहे. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाशी निगडित असलेले दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 उत्तर प्रदेशातील मथुरेत झाला. उपाध्याय आजन्म संघाचे प्रचारक होते. 1951मध्ये जेव्हा भारतीय जनसंघाची स्थापना झाली तेव्हा दीनदयाल  पक्षाचे पहिले महासचिव बनले. लोकसभेसाठी ते निवडणुकीही उतरले होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता. 11 फेब्रुवारी 1968मध्ये उत्तर प्रदेशच्या मुगलसराय इथं रेल्वे प्रवासादरम्यान त्यांची हत्या झाली होती. 

2. सरदार वल्लभभाई पटेल - गुजरातमध्ये होणाऱ्या सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी बजेटमध्ये 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींनी ही योजना सुरू केली होती. सरदार पटेल हे 'लोहपुरूष' या नावानंही ओळखले जातात. स्वतंत्र भारतात राष्ट्रीय विचारांसोबत देश बनविण्यासाठी पटेल यांचं खूप योगदान आहे. पटेल गुजरातचे राहणारे होते. पटेल काँग्रेसमध्ये होते मात्र तरीही अनेक विचारांबाबत त्यांचे नेहरूसोबत असलेले मतभेद जगजाहीर आहे. 15 सप्टेंबर 1950 ला वयाच्या 75व्या वर्षी पटेल यांचं निधन झालं. 

3. मदन मोहन मालवीय - यंदाच्या अर्थसंकल्पात मदन मोहन मालवीय यांच्या नावे एक शैक्षणिक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलाय. हिंदू राष्ट्रवादाचे समर्थक आणि हिंदू महासभेचा पाया रचणाऱ्या सदस्यांमध्ये मदन मोहन मालवीय  यांनी शिक्षण आणि समाज सुधारणेच्या क्षेत्रात अनेक योगदान दिले. वयाच्या 84व्या वर्षी 12 नोव्हेंबर 1946मध्ये वाराणसीत त्यांचं निधन झालं. 

4. लोकनायक जयप्रकाश नारायण - जेपी नावानं प्रसिद्ध असलेले जयप्रकाश नारायण यांच्या नावे बजेटमध्ये सेंटर फॉर एक्सिलंस उघडण्याची तरतूद आहे. स्वातंत्र्य सैनिक आणि पंडित जवाहर लाल नेहरू यांचे विश्वसनीय लोकांमधील एक असलेल्या जयप्रकाश यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1902ला बिहारच्या सारण जिल्ह्यातील सिताबदियारा गावात झाला. 1970मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध नेतृत्व करणाऱ्या जेपींनी संपूर्ण क्रांतीचं आव्हान केलं होतं. या दरम्यान, 'इंदिरा गांधी हटाओ'ची घोषणा दिली. 8 ऑक्टोबर 1979मध्ये पाटण्यात त्यांचं निधन झालं. 1965मध्ये मॅगसेसे पुरस्कार आणि 1999मध्ये त्यांचा भारतरत्न म्हणून सन्मान करण्यात आला. 

 5. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी - अर्थसंकल्पात श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नावे योजना सुरू करण्याची घोषणा केली गेली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारमध्ये उद्योग व पुरवठा मंत्री म्हणून श्यामा प्रसाद मुखर्जींचं नाव एक कट्टर राष्ट्र भक्त म्हणून आदर्श आहे. बंगाल विधान परिषदेत काँग्रेस पक्षातून मुखर्जी यांना राजकारणात प्रवेश घेतला. 1950मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियकत अली खान यांच्यादरम्यान दिल्लीत एक करार झाला. यानुसार अल्पसंख्यांकांसाठी वेगळ्या तरतूदी करण्याचं मान्य करण्यात आलं. पाकिस्तानसाठी नेहरूंच्या सौम्य वागणुकीचा विरोध करत मुखर्जींनी कॅबिनेटमधून राजीनामा दिला. 20 ऑक्टोबर 1951ला त्यांनी भारतीय जन संघाची स्थापना केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.