`नेहरूंच्या मते सरदार पटेल जातीयवादी!`- अडवाणी

सरदार पटेलांवर जातीयवादी असल्याचा आरोप भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केला असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 6, 2013, 12:14 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
सरदार पटेलांवर जातीयवादी असल्याचा आरोप भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केला असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. अडवाणींच्या या ब्लॉगमुळे वाद निर्माण होण्य़ाची चिन्हं दिसत आहेत.

भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवरुन नवीन वादाला तोंड फोडलं आहे. स्वातंत्र्यानंतर हैदराबादच्या विलिनीकरणासाठी ल्ष्करी कारवाई करण्याचा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आग्रह होता मात्र पंडित नेहरुंचा याला विरोध होता. आणि त्यामुळेच नाराजीनं पंडित नेहरुंनी सरदार पटेलांना तुम्ही जातीयवादी आहात असं म्हटलं होतं. असा दावा अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवर केलाय.
एम. के. के. नायर यांच्या ‘द स्टोरी ऑफ ऍन इरा टोल्ड विदाऊट थ्री विल’ या आपल्या पुस्तकात हा उल्लेख केला असल्याचंही अडवाणी म्हणालेत. यामुळे आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.