नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी झाल्याचा दावा एका वेबसाईटनं एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्यानं केलाय.

Updated: Jan 10, 2016, 09:14 AM IST
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले? title=

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी झाल्याचा दावा एका वेबसाईटनं एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्यानं केलाय. WWW.BOSEFILES.INFO या वेबसाईटनं या संदर्भात अनेक खुलासे केलेत.

18 ऑगस्ट 1945 या रहस्यमयी दिवसाबाबतचे अनेक तथ्य WWW.BOSEFILES.INFO या वेबसाईटनं जगासमोर आणलेत.. या दिवशी नेताजींनी जपानी एअरफोर्सच्या विमानानं व्हिएतनामच्या टोरेन इथून प्रयाण केलं होतं असा दावा या वेबसाईटनं केलाय. यावेळी बोस यांच्यासह 12-13 प्रवासी आणि काही क्रू मेंबरही होते. तसंच त्यांच्यासोबत लेफ्टिनेंट जनरल सुनाम्शा शिदेई हे सुद्धा होते.

हे विमान ताइपे, डेरेनमार्गे टोकियोला जाणार होते मात्र जपानी एअर स्टाफ ऑफिसर मेजर टारो कोनो यांनी या दुर्घटनेचा तपास करणा-या समितीला दिलेल्या माहितीचा उल्लेखही या बेवसाईटने केलाय. कोनो यांना सुरुवातीला विमानाच्या इंजिनात बिघाड असल्याचं जाणवलं. मात्र त्यानंतर उड्डाणासाठी विमान योग्य असल्याचं त्यांनी सांगितल्याचा उल्लेख यात आहे. मात्र विमानाचं उड्डाण होताच मोठा स्फोट झाल्याचं या वेबसाईटनं म्हटलंय.. 

या आगीत नेताजींचे कपडे जळाल्याची माहिती कर्नल रेहमान आणि कर्नल शिरो यांनी दिली होती असंही वेबसाईटनं म्हटलंय. त्यानंतर नेताजींना भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही वेबसाईटनं म्हटलंय. यानंतर काय घडलं याबाबतचा खुलासा वेबसाईट 17 जानेवारीला प्रसिद्ध करणार आहे.