www.24taas.com, राळेगणसिद्धी
अरविंद केजरीवाल यांनाही अखेर सत्तेचा मोह सुटला नाही. त्यामुळेच त्यांनी ‘आम आदमी पार्टी’ स्थापन केली आहे. त्यामुळेच मी कधीही ‘आम आदमी पार्टी’ला मतदान करणार नाही असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.
अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल यांच्या नव्याने स्थापना झालेल्या पक्षाला आपला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं आहे. आम आदमी पार्टीसुद्धा इतर पक्षांप्रमाणेच सत्तेच्या मार्गाने पैसा आणि पैशाच्या मार्गाने सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अरविंद केजरीवाल सत्तेचे लालची आहेत. त्यामुळेच मी त्यांच्या पक्षाला मतदान करणार नाही. मला आधी वाटलं होतं, की आम आदमी पार्टी प्रामाणिकपणे काम करेल. मात्र, मला आता तशी शक्यता वाटत नाही, असं अण्णा म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारेंशी फारकत घेतल्यानंतरही आपण केजरीवाल यांनी निवडलेल्या उमेदवाराचा प्रचार करू असं अण्णांनी घोषित केलं होतं. तसंच केजरीवाल कपिल सिब्बल विरुद्ध उभे राहिल्यास त्यांनाच मत देऊ असं अण्णा हजारे पूर्वी म्हणाले होते. मात्र आता अण्णांच्या मते केजरीवाल स्वार्थी बनले आहेत.