लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीने असं काही सांगितलं की पतीला बसला धक्का

उत्तर प्रदेशातील इलाहाबादमध्ये एक असं प्रकरण समोर आलं ज्यामुळे तुम्हाला ही धक्का बसेल. लग्नाच्या पहिल्याच रात्री विवाहितेने त्याच्या पतीला असं काही सांगितलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 

Updated: Apr 18, 2016, 02:13 PM IST
लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीने असं काही सांगितलं की पतीला बसला धक्का title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातील इलाहाबादमध्ये एक असं प्रकरण समोर आलं ज्यामुळे तुम्हाला ही धक्का बसेल. लग्नाच्या पहिल्याच रात्री विवाहितेने त्याच्या पतीला असं काही सांगितलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 

लग्नाच्या पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच रात्री पत्नीने ती गर्भवती असल्याचं सांगितलं आणि पतीला मोठा धक्का बसला. दोन्ही परिवारांनी मग निर्णय घेत गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. नातेवाईंकानी जबरदस्ती तिचं लग्न लावल्याची महिला तक्रार करत होती.

सकाळी पतीने ही गोष्ट त्याच्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर युवतीच्या प्रेमीने एक सीडी पाठवली ज्यामध्ये त्याच्या पत्नीचे आणि प्रेमीचे अश्लिल व्हिडिओ होते आणि युट्युब लिंक ही पाठवली ज्यावर महिलेचे ते अश्लिल व्हिडिओ अपलोड करण्यात आले होतेय यानंतर पतीने या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.