शौचालय नसल्यानं वधूचा लग्नास नकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद मिळतोय. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी अनेक भारतीय तयार आहेत. याचाच प्रत्यय कानपूरमध्ये आला. 

Updated: Apr 18, 2016, 07:49 AM IST
शौचालय नसल्यानं वधूचा लग्नास नकार title=

कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद मिळतोय. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी अनेक भारतीय तयार आहेत. याचाच प्रत्यय कानपूरमध्ये आला. 

शौचालय नसल्यानं ऐन लग्नाच्या वेळी वधूनं लग्नास नकार दिल्याची घटना कानपूरमध्ये घडलीय. नेहा श्रीवास्तव असं या वधूचं नाव आहे. लग्नाआधी घरात शौचालय बांधणार असल्याची ग्वाही वर पक्षाकडून देण्यात आली होती. मात्र ही मागणी पूर्ण करण्यात आली नसल्यानं लग्नास नकार दिल्याचं नेहानं सांगितलं.
 
घरोघरी शौचालय असणं ही गरज असल्याचं तिनं म्हटलंय. तसंच मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेला प्रत्येकानं पाठिंबा देणं आवश्यक आहे असंही तिनं आवर्जून सांगितलंय. शौचालय नसल्यानं नियोजित वराला लग्नासाठी नकार देणा-या नेहा नंतर रेशीमगाठीत अडकलीय.. शौचालय असणा-या तरुणाशी तिचं लग्न झालं. एका सामाजिक संस्थेनं आयोजित केलेल्या सामुदायिक विवाहसोहळ्यात तिचं शुभमंगल पार पडलं.