बलात्कार पीडितेच्या नावाने नवी रेल्वे?

भारतीय रेल्वेच्या नव्या आगगाडीला नवी दिल्लीतील सामूहिक बलात्कार पीडित मुलीचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. लवकरच छपरा-आनंद विहार एक्सप्रेस या आठवड्यातून एकदा प्रवास करणाऱ्या रेल्वेला ‘निर्भया एक्सप्रेस’ किंवा ‘बेटी एक्सप्रेस’ हे नाव देण्यात येऊ शकतं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 14, 2013, 05:03 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय रेल्वेच्या नव्या आगगाडीला नवी दिल्लीतील सामूहिक बलात्कार पीडित मुलीचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. लवकरच छपरा-आनंद विहार एक्सप्रेस या आठवड्यातून एकदा प्रवास करणाऱ्या रेल्वेला ‘निर्भया एक्सप्रेस’ किंवा ‘बेटी एक्सप्रेस’ हे नाव देण्यात येऊ शकतं.
ही रेल्वे बलिया मार्गे जाणार आहे. बलिया गाव हे पीडित मुलीचं जन्मगाव आहे. गेल्यावर्षी १६ डिसेंबर रोजी २३ वर्षीय मुलीवर दिल्लीमध्ये चालू बसमध्ये अमानुष बलात्कार करण्यात आला होता. काही आठवड्यात तिचा सिंगापुरच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

रेल्वे मंत्री पवन बन्सल यांनी संसदेत १९ नव्या रेल्वे गाड्या सुरू करण्यासंबंधी घोषमा केली होती. यामध्येच ही छपरा-आनंद विहार एक्सप्रेस आहे.