मुंबई : 'एनडीटीव्ही' या न्यूज चॅनलवर एका दिवसाच्या बंदीनंतर पत्रकारिता आणि सरकार याविषयी बरीच चर्चा सुरू झाली. आता, एका दिवसाची बंदी घालण्यात आलेल्या चॅनलमध्ये आणखी एका चॅनलची भर पडलीय.
हे चॅनल आहे 'न्यूज टाइम्स आसाम'... माहिती आणि जनसंपर्क विभागानं या चॅनवलवर २ नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवसभर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केलाय.
कार्यक्रम प्रसारणाचे नियम एकाहून अधिक वेळा तोडल्याचा ठपका या चॅनलवर ठेवण्यात आलाय. ऑक्टोबर २०१३ मध्ये या चॅनलला कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली होती. त्यानंतर आता तीन वर्षांनी या चॅनलवर कारवाई केली जातेय.