भारतीय रेल्वे आणि टॅल्गोचा करार नाही, मग चाचण्या कशाला?

वेगवान स्पॅनिश टॅल्गो ट्रेनच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. मात्र त्यावरून आता नवा वाद उफाळण्याची चिन्हं आहेत.

Updated: Sep 12, 2016, 09:09 PM IST
भारतीय रेल्वे आणि टॅल्गोचा करार नाही, मग चाचण्या कशाला? title=

मुंबई : वेगवान स्पॅनिश टॅल्गो ट्रेनच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. मात्र त्यावरून आता नवा वाद उफाळण्याची चिन्हं आहेत. या ट्रेनच्या चाचण्यांसाठी कोणताही करार भारतीय रेल्वे आणि कंपनी यांच्यात झालेला नाही. त्यामुळे या चाचण्यासाठी पैसा खर्च करण्यात काय अर्थ आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

रेल्वेने आत्तापर्यंत 2 कोटी 56 लाख रूपये या चाचण्यांवर खर्च केले आहेत. टॅल्गो ट्रेन निर्माण करणा-या कंपनीने केवळ माद्रीद ते मुंबई आणि मुंबई ते उत्तर प्रदेशातील इज्जत नगर या प्रवासाचा खर्च उचलला आहे.

रेल्वेच्या सध्याच्या रूळांवर कोणतीही चाचणी करण्याची परवानगी नाही असं मत रेल्वे बोर्डाच्या एका माजी अधिका-याने डीएनए या वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केलं आहे. टॅल्गोच्या चाचणीविषयी हे प्रश्न उपस्थित व्हायला लागल्यावर रेल्वेने य़ासंबंधी मौन बाळगलं आहे.