अॅसिड हल्ल्याचा गुन्हा ठरणार अजामीन पात्र !

अॅसिड हल्लाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिलाय. अॅसिड हल्ला अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. आरोपीवर आता कठोर कारवाई होणार आहे. पीडित व्यक्तीला ३ लाखांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 18, 2013, 08:14 PM IST

अॅसिड हल्लाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिलाय. अॅसिड हल्ला अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. आरोपीवर आता कठोर कारवाई होणार आहे. पीडित व्यक्तीला ३ लाखांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. तर घटनेनंतर 15 दिवसांत १ लाखांची मदत द्यावी तसंच ३ महिन्यांत अंमलबजावणीचे निर्देश कोर्टाने दिलेत. उपचार आणि पुनर्वसनाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे...
अॅसिड हल्ला करणाऱ्याची खैर नाही !
अॅसिड हल्ल्याचा गुन्हा ठरणार अजामीन पात्र !
अॅसिड हल्ल्यातील गुन्हेगार होणार गजाआड !
अॅसिड हल्ल्याचा गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे गुन्हा करुनही या प्रकरणातले गुन्हेगार तुरुंगापासून दूरच होते....पण आता हा गुन्हा अजामीनपात्र होणार आहे..
दिवसेंदिवस वाढत्या अॅसिड हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अॅसिड हल्ल्याचा गुन्हा अजामीन पात्र करण्याचे निर्देश सर्वेच्च न्यायालयाने दिलेत...तसेच अॅसिड विक्रीसंदर्भात तीन महिन्याच्या आत कडक नियम तयार करण्याचा आदेश सर्व राज्य सरकार तसेच केंद्रशाशित प्रदेशांना दिलाय...ऍसि़ड हल्ल्यासंदर्भातील एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हा अत्यंत महत्वपूर्ण आदेश दिलाय...अॅसिड हल्ल्यातील पीडिताला राज्य सरकारकडून दिली जाणारी आर्थिक मदत तुटपूंजी असल्याचं नमूद करत या रक्कमेत वाढ करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत..
पीडिताला मिळणार ३ लाखांची नुकसानभरपाई !
घटनेनंतर १५ दिवसात मिळणार १ लाख रुपये !
उरलेले २ लाख मिळणार दोन महिन्याच्या आत !
आज बाजारात सहजासहजी अॅसिड विकत घेता येतं असल्यामुळे अॅसिड हल्ल्यांच्या घटनांवर लगाम लावणं शक्य होत नव्हतं.....यापार्श्वभूमीवर सीड विक्रीसंदर्भात नवीन नियमावली तयार करण्याता आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय..
अॅसिड विक्रीसंदर्भात लागू होणार नवे नियम !
राज्य सरकार तयार करणार कठोर नियम !
अॅसिड हल्ल्याच्या वाढत्या घटनांवर सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतल्यामुळे आता सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली आहे..अॅसिड विक्रीसाठी परवान तसेच खरेदीसाठी ओळखपत्र आवश्यक करणार असल्याचं यापूर्वीच सरकारने स्पष्ट केलंय...त्यामुळे भविष्यात अॅसिड हल्ल्यांच्या घटनांवर लगाम लागण्यास मदत होणार आहे...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.