www.24taas.com, झी मीडिया, बिकानेर
तुमच्याकडे बनावट नोट आहे का? पण आता काळजी नको. कारण बनावट नोटांच्या बदली तुम्हाला मिळणार खऱ्या नोटा. बनावट नोटांविरोधात सरकारचा नवा प्रयत्न चालू आहे. तुमच्याकडे जर खोटी नोट आली तर घाबरून जाण्याचे काही कारण नाही कारण आता बँका देणार खऱ्या नोटा.
रिर्झव्ह बॅंकेने ही घोषणा आधीच केली होती त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्यात आलेय. बँकांना यासंबधीचे अहवाल आरबीआयला ऑगस्ट २०१३ पासून द्यावा लागेल. जर १०० अथवा अधिक बनावट नोटांना ओळखून याची सूचना बँकांनी आरबीआय आणि पोलिसांना दिली तर बनावट नोटांमुळे होणाऱ्या नुकसानीची २५ टक्के भरपाई आरबीआय करेल.
बनावट नोटांमुळे सामान्य लोकांचे नुकसान होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकाद्या बँकेने बनावट नोट ओळखण्यास किंवा टाळाटाळ केली तर याप्रकणी बॅंकेला जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे बँक आपली जबादारी झटकणार नाही. आपल्या कामात कसूर केल्यास बँकेला दंड ठोठावण्यात येईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.