वेस्टइंडीजविरोधात टीमबरोबरच कोहलीची कसोटी

ट्राय सिरीज या तिरंगी मालिकेत टीम इंडियाची करो या मरोची स्थिती आहे. इंडिजबरोबरचा सामना जिंकून चालणार नाही तर मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. नाहीतर आपले सामान गुंडाळून मायदेशी परतावे लागेल. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated: Jul 5, 2013, 04:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जमैका
ट्राय सिरीज या तिरंगी मालिकेत टीम इंडियाची करो या मरोची स्थिती आहे. वेस्टइंडीजबरोबरचा सामना जिंकून चालणार नाही तर मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. नाहीतर आपले सामान गुंडाळून मायदेशी परतावे लागेल. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मालिकेतील दोनवेळी हरलेल्या टीम इंडियावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. आता टुर्नामेंटमध्ये आपले स्थान कायम करण्यासाठीची स्थिती फारच गंभीर झाली आहे. पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क मैदानातील परिस्थिती मात्र भिन्न असेल. पण, त्याचवेळी भारतावर दोनदा विजय पटकावलेल्या वेस्टइंडीज संघाचा आत्मविश्वासाला दुजोरा देण्यासाठी प्रशंसकांची कमतरता नसेल. शुक्रवारी वेस्टइंडीजच्या विरोधात होणाऱ्या या तिसऱ्या सामन्यात भारताला आपला चांगला रन रेट बनवून फक्त बोनस पॉईंट मिळवण गरजेच नसून तर, इतर संघही कसे खेळतायत त्यावरही लक्ष ठेवणं गरजेच आहे. तरच भारतीय संघ यात आपला जाम बसवू शकेल.
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला जखम झाल्यामुळे संघाची जबाबदारी विराट कोहलीवर देण्यात आली होती. मात्र, त्याला फारशी चमक दाखविता आली नाही. चॅम्पियन्स चषक पटकावणाऱ्या भारतीय संघाची गोलंदाजी गेल्या काही दिवसांपासून डगमगल्याची दिसून येतेय. श्रीलंकेच्या विरोधातील गेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला बसवून मोहम्मद शमीला खेळवण्यात आलं. शमीसहीत अनेक गोलंदाज आपल्या प्रदर्शनात कमकुवतच पडले, तर उलट त्यांनी अतिरिक्त २३ रन्स देण्यात यशस्वी ठरले. तर, आता विराट कुमार आणि शमी या दोघांपैकी कोणावर आपला विश्वास दाखवणार ते पाहायचय.
फलंदाजीबद्दल म्हणायच तर, गेल्या चॅम्पियन्स चषकामध्ये भारतीय संघाने आपली कामगिरी प्रभावीरित्या बजावलेली. तर, तिरंगी मालिकेत मात्र त्यांना अपयश येताना दिसतय. भारताची फलंदाजी कितीही चांगली असली तरी त्याचे प्रत्यक्ष दर्शन आता देणं गरजेच आहे. त्यामुळे याचा अधिक भार कर्णधार कोहलीवरही आहेच. वेस्टइंडीज संघाकडे उत्कृष्ट फलंदाज क्रिस गेल तर, गोलंदाज सुनील नरीन आहेत.
पहिल्या सामन्यात गेलचा परफॉर्मन्स तर आपण पाहिलाच पण, आता जॉनसन चार्ल्स, मार्लन सैमुअल्स, किरन पोलार्ड आणि कर्णधार ड्वेन ब्रावो सुद्धा सज्ज झाले आहेत. एकंदरित आता सामना रोमांचक होईल अशी आशा आहे. वेस्टइंडीजमध्ये या सामन्यासाठी प्रेक्षकांमध्ये इतकी उत्सुकता आहे, ज्यामुळे सर्व टिकीटे सामन्याच्या दोन दिवल आधीच विकल्या गेल्यात. त्यामुळे २०००० प्रेक्षकांनी भरलेल्या या स्टेडिअममध्ये हा सामना चांगलाच रंगणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.