नोएडा : उत्तर प्रदेशचा नोएडा सेक्टर ७३मध्ये एका बिल्डिंग अपार्टमेंटच्या वॉशरूममध्ये मंगळवारी पती-पत्नीचे मृतदेह नग्न अवस्थेत सापडले. वॉशरूम आतून बंद होता. दरम्यान हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
मूळचे बंगळूरूचे रहिवासी असलेल्या गेम्बली नवीन येथील एका अपार्टमेंटच्या फर्स्ट फ्लोअरमध्ये आपली पत्नी दक्ष्यानी, पाच वर्षाचा मुलगा महेश आणि तीन वर्षाची मुलगी मोनिका यांच्यासोबत भाड्यातत्वाने राहत होते. सकाळी आई-वडील दरवाजा उघडत नाही म्हणून मुलं स्कूलला गेले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रात्री काही पाहुणे यांच्या घऱी आले होते. त्यानंतर पती-पत्नीत मोठे भांडण होते. या संदर्भात मृतांच्या परिवाराला बंगळुरू येथे माहिती दिली आहे.