'प्रियांका एकट्या काँग्रेसला तारू शकत नाहीत'

काँग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी , प्रियांका गांधी या काँग्रेस पक्षात सक्रीय झाल्या आहेत. परंतु, कोणीही एक नेता पक्षाला तारू शकत नाही, यासाठी सर्वांचीच मदत लागणार असल्याचं म्हटलं आहे.

Updated: Jul 18, 2016, 07:52 PM IST
'प्रियांका एकट्या काँग्रेसला तारू शकत नाहीत' title=

हैदराबाद : काँग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी , प्रियांका गांधी या काँग्रेस पक्षात सक्रीय झाल्या आहेत. परंतु, कोणीही एक नेता पक्षाला तारू शकत नाही, यासाठी सर्वांचीच मदत लागणार असल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाची धुरा प्रियांका गांधी यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची चचा आहे, उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे, या पार्श्वभूमीवर हे महत्वाचे मानले जात आहे.

'कोणीही मागे असणार नाही. 'अ' सुद्धा काम करणार आहे, 'ब' सुद्धा आणि 'सी' सुद्धा तेच काम करणार आहे. सर्वांनी एकत्रित मिळून काम केल्यास विजय मिळविणे सोपे जाणार आहे.'केवळ एखादी व्यक्ती जादू करू शकत नाही. यासाठी प्रत्येकाला आपापली जबाबदारी ओळखून काम करावे लागणार आहे', असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

'विविध बाजूंनी पक्षाचे काम व्यवस्थित सुरू असून, हे टीम वर्क आहे , उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीला ८ महिने बाकी असताना, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून शिला दीक्षित यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे, असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.