गँगरेप पीडितेवर त्यांनी पुन्हा केला गँगरेप

हरियाणाच्या रोहतकमध्ये गँगरेप पीडित महिलेवर पुन्हा त्याच आरोपींनी गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Updated: Jul 18, 2016, 07:06 PM IST
गँगरेप पीडितेवर त्यांनी पुन्हा केला गँगरेप  title=

रोहतक : हरियाणाच्या रोहतकमध्ये गँगरेप पीडित महिलेवर पुन्हा त्याच आरोपींनी गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गँगरेपमधल्या पाच आरोपींनी तीन वर्षानंतर या पीडितेचं अपहरण केलं आणि तिच्यावर पुन्हा एकदा बलात्कार केला. या महिलेवर अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिला झाडांमध्ये फेकून देऊन तिकडून पळ काढला. हे आरोपी अजूनही फरार आहेत. 

ही मुलगी कॉलेजमधून घरी जात असताना तिच्यावर गँगरेप करण्यात आला. मूळची भिवानीची असलेली ही मुलगी शिक्षणासाठी रोहतकमध्ये भाड्याच्या खोलीमध्ये राहते. पहिल्या गँगरेपप्रकरणी कोर्टाबाहेर तोडगा काढण्यासाठी या आरोपींनी प्रयत्न केला, पण महिलेनं आरोपींची ही मागणी मान्य न केल्यामुळे तिच्यावर पुन्हा एकदा बलात्कार करण्यात आला. 

या पीडित मुलीला बेशुद्ध अवस्थेमध्येच रोहतकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या मुलीचं पाच आरोपींनी अपहरण केलं आणि तिला नशेचं औषध देऊन एका सुमसाम जागेवर नेण्यात आलं. या ठिकाणी बलात्कार करून तिला झाडांमध्ये फेकून देण्यात आलं. 

2013 मध्ये या मुलीवर गँगरेप झाला होता. या प्रकरणातले सगळे आरोपी 20 ते 30 वर्षांचे असून सगळे जामिनावर बाहेर आहेत, असं या मुलीच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.