लक्ष द्या! इन्कम टॅक्स रिटर्न भरा आता 31 ऑक्टोबरपर्यंत!

आतापर्यंत आपण आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नसेल तर आता आनंदाची बातमी. सरकारनं इन्कम टॅक्स रिटर्न भरायची तारीख 31 ऑक्टोबर 2015पर्यंत वाढविण्यात आलीय. 

Updated: Oct 1, 2015, 04:09 PM IST
लक्ष द्या! इन्कम टॅक्स रिटर्न भरा आता 31 ऑक्टोबरपर्यंत! title=

नवी दिल्ली: आतापर्यंत आपण आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नसेल तर आता आनंदाची बातमी. सरकारनं इन्कम टॅक्स रिटर्न भरायची तारीख 31 ऑक्टोबर 2015पर्यंत वाढविण्यात आलीय. 

आयकर कायद्याच्या कलम 44एबी अंतर्गत आयकर आणि ऑडिट रिपोर्टचे रिटर्नच्या ई-फायलिंगची अखेरची तारीख 30 सप्टेंबर 2015 पासून वाढविण्याबाबत देशभरात विविध हायकोर्टांमध्ये याचिका दाखल केली गेली होती. जिथं काही न्यायालयांनी आयकर भरण्याची तारीख वाढविण्याच्या बाजूनं तर काही न्यायालयांनी विरोधात निर्णय दिला. 

विविध क्षेत्रात राहणाऱ्या करदात्यांमधील भेदभाव संपविण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठीचा वेळ पाहून सरकारनं कलम 44एबी अंतर्गत आयकर आणि ऑडिट रिपोर्टचे रिटर्न भरण्याची तारीख वाढवून आता 31 ऑक्टोबर 2015 केलीय. यापूर्वी अखेरची तारीख 30 सप्टेंबर 2015 होती. 

आणखी वाचा - टॅक्स रिफंड मिळवायचा असेल तर 'ऑनलाईन'च रिटर्न भरा!

यासाठी सीबीडीटीनं आयकर कायद्यातील 1961च्या कलम 119 अंतर्गत आवश्यक आदेश दिले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.